माहिती
Vijay Krida Mandal Navratri नवरात्रोत्सव म्हंटलं की आपल्याला आठवतो गरबा, दांडिया आणि लोकांची धमाल! यंदा आपलं विजय क्रीडा मंडळ नवरात्रोत्सवासाठी खास तयारी करण्यात आली आहे. मोठ्या उत्साहात आणि जुन्या आठवणींना उजाळा देतंय. ३ ऑक्टोबर २०२४ पासून नऊ दिवस धम्माल असणार आहे, जी हसत खेळत संपेल हे नक्की!
आपलं मंडळ(Vijay Krida Mandal Navratri) नेहमीप्रमाणे लक्ष्मीनगर, कुपवड रोड, सांगली इथे भव्य दिव्य तयारी करून सज्ज आहे. मंडळाने यंदा दांडियासाठी खास मांडणी केली आहे, जिथे पुरूष आणि महिलांसाठी वेगवेगळ्या जागांची व्यवस्था केली आहे. याशिवाय, गणपती मंदिराच्या बाजूला देवीची प्रतिष्ठापना मंडप आहे, जिथे भक्त देवीच्या दर्शनासाठी येऊ शकतात.
तुमच्या खेळात रंगत आणण्यासाठी आमचं मंडळ फव्वारा सुद्धा सजवून ठेवतंय, ज्यामुळे तुमचं वातावरण आणखी प्रसन्न होईल.
दांडियाची खास मांडणी
दांडिया खेळायला आम्ही खास मुलं आणि पुरुषांसाठी वेगळी जागा राखून ठेवली आहे, जेणेकरून सर्वजण मोकळेपणाने आपली कला दाखवू शकतील. आणि महिलांसाठी वेगळी दांडियाची जागा करण्यात आली आहे. एका बाजूला पुरुष मंडळीनं नाचत आहेत, तर दुसऱ्या बाजूला महिलांचं रंगीबेरंगी नृत्य पाहायला मिळणार आहे. यासोबतच, कार्यक्रमाच्या मध्यभागी आकर्षक फाउंटन उभारण्यात आले आहे, जे वातावरणात आनंद आणि ऊर्जेची भर घालणार आहे.
ऑर्केस्ट्रा स्टेज आणि साउंड सिस्टीम
मंडळाच्या(Vijay Krida Mandal Navratri) प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या गाण्यांसाठी खास ऑर्केस्ट्रा स्टेज बनवलं आहे. नवीन आणि जुनी गाणी, त्यासोबत धडाकेबाज साऊंड सिस्टिमने तुमचं मन रिझवणार आहे. ज्यावर प्रत्येक रात्री वेगवेगळी गाणी आणि पारंपरिक ढोल-ताशा यांचं वादन होणार आहे. ऑर्केस्ट्रासाठी उत्तम साउंड सिस्टीमही उभारली आहे, जेणेकरून प्रत्येकाला आवाजाची स्पष्टता अनुभवता येईल.
प्रवेशद्वार आणि गॅलरी
प्रवेशासाठी खास प्रवेशद्वाराची मांडणी केली आहे. हजारो लोकांकरिता बसण्याची व्यवस्था असलेल्या गॅलरीमध्ये आपले मित्र-परिवार बसून हा कार्यक्रम आनंदाने अनुभवू शकतील. सर्वात महत्वाचं म्हणजे, मंडळाने(Vijay Krida Mandal Navratri) पारंपरिकतेला जपून दांडियाच्या जागेसोबतच प्रेक्षकांसाठी विशेष व्यवस्था केली आहे, जेणेकरून त्यांना सोहळ्याचा भरपूर आनंद घेता येईल.
नवरात्रीच्या ९ दिवसांची यादी आणि रंग
आम्ही नवरात्रोत्सवात प्रत्येक दिवशी खास रंगांची परंपरा ठेवली आहे, ज्यामुळे सोहळ्यात रंगांची उधळण पाहायला मिळणार आहे. यासोबतच, प्रत्येक दिवशी देवीच्या विविध स्वरूपांची पूजा आणि आराधना केली जाणार आहे.
दिनांक | वार | साडीचा रंग |
३ ऑक्टोबर | गुरुवार | पिवळा |
४ ऑक्टोबर | शुक्रवार | हिरवा |
५ ऑक्टोबर | शनिवार | करडा |
६ ऑक्टोबर | रविवार | नारंगी |
७ ऑक्टोबर | सोमवार | पांढरा |
८ ऑक्टोबर | मंगळवार | लाल |
९ ऑक्टोबर | बुधवार | निळा |
१० ऑक्टोबर | गुरुवार | गुलाबी |
११ ऑक्टोबर | शुक्रवार | जांभळा |
नवसाची नवमी
या नवरात्रीच्या सोहळ्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजे नवसाची नवमी. नवमीच्या दिवशी देवीच्या खास पूजेसाठी भाविक मोठ्या संख्येने येतात, नवस फेडण्यासाठी देवीला नारळ, फुलं अर्पण करतात, आणि हा धार्मिक अनुभव घेतात.
या ९ दिवसांच्या उत्सवात मित्रपरिवार, नातलगांसह सामील होऊन आनंद घ्या. एकमेकांसोबत खेळत, हसत, नाचत या सोहळ्यात रंगून जा आणि नवरात्रीचं सुंदर स्मरणीय अनुभव आपल्या मनात साठवा.
सर्वांचं स्वागत आहे! सांगलीतील लक्ष्मीनगर, कुपवाड रोडवर आयोजित होणाऱ्या या(Vijay Krida Mandal Navratri) नवरात्रोत्सवात आपल्या सर्व मित्र-परिवारासह आनंदाने सहभागी व्हा. मंडळाच्या वतीने आपले हार्दिक स्वागत आहे!
जर तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर खालील नावांवर क्लिक करा आणि जाणून घ्या की शेअर बाजारातून पैसे कसे कमावले जाऊ शकतात, तसेच तुम्ही तुमचा व्यवसाय कसा वाढवू शकता किंवा छोटे छोटे प्रॉफिट्स कसे बुक करू शकता.
- Mid-Cap vs Large-Cap: Aaj Share Market Me Kaun Jeeta?
- Top 3 Penny Stocks Gainers Today | Strategy to Invest 2024
- Top Small-Cap Stocks Today | Best Strategy to Invest 2024
- Sector-Wise Stock Movers: Strategy to Invest in Shares 2024
आणखी माहिती हवी असल्यास तुम्हाला moneyexplain.com या वेबसाइटवर संपूर्ण माहिती मिळेल.